Home महाराष्ट्र “कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत...

“कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”

आताचं सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचा कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते. ओबीसींना आवाज आणि नेता मुंडे यांनी दिला. मोदींनी नेहमी गरीबाचा विचार केला. 2011 मध्ये आपण पोट माळ्याचा निर्णय घेतला. हे नविन सरकार नुसती घोषणा करतं., अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेनं स्वतःचं घर किती गळकं आहे ते पाहावं; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावूक; म्हणाले,पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय…

विनायक राऊतांमुळंच महाराष्ट्राची मान खाली गेली; निलेश राणेंचा हल्लाबोल