विनायक राऊतांमुळंच महाराष्ट्राची मान खाली गेली; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका इंग्रजी प्रश्नावरुन विनायक राऊत यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना डिवचलं होतं.

हे ही वाचा : “आता मनसेचा शिवसेनेला दणका; कोकणातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश”

लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. कनीमोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही, असं विनायक राऊत म्हणाले. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत कधी मंत्री तरी झाले आहेत का? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांना कधी मंत्री तरी केले आहे का? लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहातात तेव्हा ते अर्धे मराठी आणि अर्धे हिंदीमधून बोलतात. राऊतांनी कोकण आणि महाराष्ट्राची मान खाली घातली आहे, असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?; भाजप आमदाराची राज्य सरकारवर टीका

अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात, तो प्राणपणाने जपणार; धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

शरद पवार हे पाॅवर हाऊस, त्यांचा नेम अचूक; जयंत पाटलांकडून स्तुतीसुमने

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here