Home क्रीडा “ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”

“ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या 20-20 सामन्यात एलिसा हिली हिनं आंतरराष्ट्रीय 20-20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे.

महेंद्रसिंग धोनीने 20-20 कारकीर्दीत 98 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना यष्टीमागे 91 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्यात 57 झेल आणि 34 यष्टीचीतचा समावेश आहे. एलिसा हिलीनं आज ब्रिस्बेनमध्ये झालेल्या 20-20 सामन्यात न्यूझीलंडच्या अॅमी सदरवेटला यष्टीचीत करत धोनीचा विक्रम मोडीत काढला.

दरम्यान, एलिसा हिलीनं 114 सामन्यात 92 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात

“महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का?; याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं”

एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला आहे- गुलाबराव पाटील