Home क्रीडा मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

दुबई : आयपीएलच्या आजच्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबने दमदार सुरूवात केली आहे. सलामीला आलेल्या के.एल.राहूल व मयंक अगरवालने पंजाबला आक्रमक सुरूवात करून दिली आहे. दोघांनी 16.3 षटकात 183 धावांची सलामी दिली आहे. मयंकने 50 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 10 चाैकार व 7 षटकार मारले आहेच.

कर्णधार राहुलने 46 चेंडूत 64 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात

“महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का?; याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं”

एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला आहे- गुलाबराव पाटील

मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन