Home महाराष्ट्र “विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”

“विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”

322

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विधान परिषदेतील शिवसेना आमदारांचं संख्याबळ तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अवलंबून असल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा : “अखेर मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; उद्या भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदार शपथ घेणार”

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने याबाबत विधिमंडळ सचिवांना पत्र देण्यात आले आहे. यामध्ये विधानपरिदेच्या विरोधी पक्षनेते पदी आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आम्ही सरकारला पाठिंबा दिला, याचा अर्थ असा नाही की…; मनसे आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”

…तर मी देखील राजकारणात नसतो; नाशिक दाैऱ्यात अमित ठाकरेंचं मोठं विधान