Home महाराष्ट्र आम्ही सरकारला पाठिंबा दिला, याचा अर्थ असा नाही की…; मनसे आमदार राजू...

आम्ही सरकारला पाठिंबा दिला, याचा अर्थ असा नाही की…; मनसे आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेनंही या नवीन सरकारला पाठिंबा दिला. तसेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केलं आहे. मात्र आता अशातच राजू पाटील यांनी शिंदेंच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा नाही की, आम्ही जे चाललंय ते सर्व खपवून घेऊ, असं विधान राजू पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजू पाटील यांच्या या विधानानं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी टास्क फोर्स बनवत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली होती. पण अशा प्रकारचं काम आमच्या भागात कुठेही झालं नाही. डोंबिवली, कल्याण भागातही असं काम झालेलं दिसत नाही. ठाण्याचे मुख्यमंत्री असताना परिसरातील खड्डे भरले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे, असं राजू पाटील म्हणाले.

आम्ही सरकारला समर्थन दिलं आहे, याचा अर्थ असा नाही की, आमचा यांच्या वाईट गोष्टींना समर्थन आहे. यावर कुणीतरी बोलायला पाहिजे. त्यामुळे आम्ही बोलतोय. त्यामागची भावना कुणावरही टीका करण्याची नाही, तर अशा कामांकडे लक्ष वेधण्याची आहे. जिथे कामं झाली नसतील, तिथे आम्ही बोलणार आहोत. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या सरकारला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ असा होत नाही की, राज्यात जे काही चाललंय ते सर्व खपवून घेऊ, जिथे-जिथे अन्याय दिसेल, तिथे आम्ही बोलणार, असा इशाराही राजू पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर मी देखील राजकारणात नसतो; नाशिक दाैऱ्यात अमित ठाकरेंचं मोठं विधान

“शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले”

मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रात किती फिरत होता?; बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना सवाल