Home महाराष्ट्र “शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर...

“शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊनही एक महिना होत असला तरी, अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. अशातच शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले दीपक केसरकर, शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे भाष्य केलं आहे. यावरून आता शिवसेना नते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी आधी ही भूमिका घेतली असती तर ही वेळ आज आली नसती, अजूनही वेळ गेली नसून दरवाजे खुले आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रात किती फिरत होता?; बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना सवाल

शहाजी पाटील, उदय सामंत यांची शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांना फार उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. ही भूमिका जर आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्षप्रमुखांचं नेतृत्व त्यांना मान्य असेल तर त्यांना आमचे नेहमीच दरवाजे उघडे आहेत, असं सचिन अहिर म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करा; निलेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ

“सत्तांतर झाल्यापासून अजित पवारांना राजकारण कमी, भविष्यवाणी अधिक कळू लागलीये”