Home महाराष्ट्र “अखेर मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; उद्या भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदार...

“अखेर मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; उद्या भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदार शपथ घेणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

18 जणांच्या नावांची यादीही तयार असल्याची माहिती समोर आली असून भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या 9 जणांपैकी भाजपची पाच नावे निश्चित झाली आहेत. तर शिंदे गटातील पाच जणांनाही फोन गेल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : आम्ही सरकारला पाठिंबा दिला, याचा अर्थ असा नाही की…; मनसे आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत हे मंत्रीपदासाठी उद्या शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, शिंदे गटाची उद्या सकाळी 9 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं काही जण नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”

…तर मी देखील राजकारणात नसतो; नाशिक दाैऱ्यात अमित ठाकरेंचं मोठं विधान

“शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले”