Home क्रीडा जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं...

जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं काैतुक

193

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने शतकी खेळी करत भारताला सामन्यासोबतच मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. पंतच्या या खेळीचं सर्वच स्तरावरून काैतुक होत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमामन उल हकनेही ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीचं कौतुक केलं आहे.

ऋषभ पंत जेंव्हा कधी फलंदाजी करतो तेव्हा आपण सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत असल्याचा भास होत असल्याचं इंझमामने म्हटलं आहे. कितीही दबाव असला तरी फरक पडत नाही हा सेहवागचा गुणधर्म पंतमध्येही असल्याचं इंझमामने म्हटलं आहे.

ऋषभ पंत अतिशय उत्तम खेळाडू आहे. खूप दिवसांनी मी असा खेळाडू पाहिलाय ज्याच्यावर दबावाचा कोणताही परिणाम होत नाही. 146 धावांवर 6 गडी बाद झालेले असतानाही ज्या पद्धतीने तो सुरुवात करतो, तसं कोणीही करत नाही. तो आपले शॉट खेळत असतो आणि यावेळी खेळपट्टी कशी आहे किंवा समोरच्या संघाने किती धावा केल्या आहेत याचा त्याला फरक पडत नाही, असं इंझमाम म्हणाला.

दरम्यान, फिरकी गोलंदाज असो किंवा जलद गोलंदाज दोघांविरोधात त्याची खेळी उत्तम आहे. त्याला खेळताना पाहून मीदेखील आनंद लुटत होतो. जणू काही सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत होतो, असंही इंझमाम म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी –

यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार

14 वर्षीय मुलावर महिलेनं केला बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा