Home महाराष्ट्र महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार

महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना महिला दिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतच अजित पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती.

माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी 8 मार्चचं महत्व सांगितलं होतं. आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घराला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही, असं अजित पवार म्हणाले.

तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे. कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून 1 एप्रिल 2021 पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

महत्वाच्या घडामोडी –

14 वर्षीय मुलावर महिलेनं केला बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा

मोठी बातमी! ‘या’ साठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन; म्हणाले…

“माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ताठर, गडी ऐकायलाच तयार नाही”