Home महाराष्ट्र यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेल दरात कपात केली जाणार असल्याची चर्चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सुरू होती. मात्र, सरकारकडून कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चोराच्या उलट्या बोंबा असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. ज्या टक्केवारीने पेट्रोल डिझेलवर कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. 100 रुपये पार केले. ही पूर्णपणे जबाबदारी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्याचे कर कमी करायला लावायचे, हा पूर्णपणे राज्यांवर अन्याय आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, तर राज्यांच्या महसूलामध्येही घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन सांगावं की, आम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून द्या म्हणजे राज्यातील जनतेवरील पेट्रोल-डिझेलचा बोझा कमी होईल, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार

14 वर्षीय मुलावर महिलेनं केला बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा

मोठी बातमी! ‘या’ साठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन; म्हणाले…