पार्थ पवार राजीनाम्यावर ठाम? तर इद्रिस नायकवडी थेट CM फडणवीसांच्या संपर्कात; मिरज पुन्हा हाय वॉल्टेज वर.

0
65

पार्थ पवारांचा दबाव वाढला पण इद्रिस नायकवडीं पुन्हा दाखवनार जुना डाव????

मिरज-:राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आता चांगलेच तापले असून आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पक्षातील नव्या पिढीकडून, विशेषतः पार्थ पवार गटाकडून नायकवडींना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मात्र, इद्रिस नायकवडी एवढ्या सहज बधणारे नेते नाहीत, अशी चर्चा आता सांगलीत सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नायकवडी हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर “घाईत कोणतीही कारवाई करू नका… थंडा करके खाओ,” असा सल्लाही मुख्यमंत्री स्तरावरून देण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या MLC राजीनामा प्रकरणामुळे जुन्या राजकीय आठवणीही पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सांगलीचे महापौर असताना देखील तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नायकवडींना राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र, त्यावेळीही इद्रिस नायकवडी यांनी ठाम भूमिका घेत राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे “एकदा नाही तर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती?” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नायकवडी यांनी “मला अधिकृतपणे कुणीही राजीनामा मागितलेला नाही,” असे स्पष्ट करत सर्व अफवा फेटाळल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीतील वाढत्या अंतर्गत संघर्षामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here