“शरद पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला”

0
302

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : शरद पवारांच्या रूपाने राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जयंत पाटील यांनी ठाणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी ठाणे शहर राष्ट्रवादी कार्यकारणी, ठाणे विधानसभा, मुंब्रा-कळवा विधानसभा, ओवळा-माजीवाडा विधानसभा, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यात ते बोलत होते.

हे ही वाचा : “समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही”

ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस विचारांचा एकेकाळी गड होता. मात्र हळुहळू पक्षाची ताकद कमी पडू लागली. आता या भागासाठी एक अचूक रणनीती तयार करण्याची वेळ आली आहे. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, काम करण्याची रग आहे, वेळ आली तर कुणालाही शिंगावर घेण्याची धमक आहे. या ताकदीचा योग्य वापर करण्यासाठी लवकरच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक नवा कार्यक्रम तयार केला जाईल., असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पवारांच्या रूपानं राष्ट्रवादी पक्षाला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला आहे, आपण एकत्र येऊन आपल्या पक्षाला सर्वोत्तम पक्ष बनवू, असं आवाहन जयंत पाटलांनी उपस्थितांना केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

नवाब मलिकांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता पुढची कथा मी सांगणार- संजय राऊत

माझे आणि राष्ट्रवादीचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार; शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला विश्वास

“पाकिस्तानविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर सांगलीत क्रिकेटप्रेमींनी टी.व्ही. फोडला; पहा फोटो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here