नवाब मलिकांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता पुढची कथा मी सांगणार- संजय राऊत

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. यानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच आणि किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी निशाणा साधला आहे.

प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ शेअर करून एक मोठा गौप्यस्फोट केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत प्रभातर साईलचं काैतुक केलं आहे. राज्याच्या गृहखात्याने प्रभाकरला सुरक्षा पुरवली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : माझे आणि राष्ट्रवादीचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार; शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला विश्वास

वसुली गँग कुणाच्या होत्या. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा मी तुम्हाला लवकरच सांगेन. या प्रकरणातील तथ्य आणि सत्य खूप धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणातील साक्षीदार साईल याच्या केसालाही धक्का लागणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहोत., असं आश्वासन संजय राऊतांनी यावेळी दिलं.

दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने महाराष्ट्रासह देशावर मोठे उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“पाकिस्तानविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर सांगलीत क्रिकेटप्रेमींनी टी.व्ही. फोडला; पहा फोटो”

सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

रोज ‘लवंग’ चे सेवन करा होतील हे फायदे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here