Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक...

उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत आयएनएस आणि सी-व्होटर्सने देशपातळीवर एक सर्व्हे केला. लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

हा सर्व्हे कोणाचा आहे, ते मला माहिती नाही. हा सर्व्हे मी बघितला नाही. कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील, तर ते चांगलंच आहे. पण आता अपेक्षा एवढीच आहे, की महाराष्ट्र सरकारने कोविडमध्ये चांगलं काम केलं पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

“रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया”

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जातंय; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार

राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल