Home महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार

छत्रपतींच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया- अजित पवार

मुंबई : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. त्याचबरोबर राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी’ महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं.

महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपलं वाटेल, जिथं सर्वांना न्याय मिळेल असं स्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला, असं अजित पवार म्हणाले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया,” अशा शब्दात अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी-

राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल

विराट-रोहितमध्ये कोण भारी; ब्रॅड हॉग म्हणतो…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”