Home महाराष्ट्र “केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

“केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

सिंधुदुर्ग गेल्या आठवड्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली. यात नारायण राणे यांना केंद्रीय विस्तारामध्ये मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. यावर शिवसेना पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज असल्याचं उदय सांमंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व संपूर्ण जगाला दिसलेलं आहे आणि यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना काम करत आहे. उद्धव ठाकरे यांचं कतृत्व कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे कितीही काही केलं तरी शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर उरलेले आम्ही दोन पक्ष एकत्र राहू- जयंत पाटील