Home महाराष्ट्र शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला...

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

मुंबई : कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागली असून त्याची दुरावस्था झाली आहे. यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटेंनी सरकारला दिला.  विनायक मेटेंनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

मुंबईत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या ऑफिसची दुरावस्था आघाडी सरकारमुळे झाली आहे. दीड वर्षात आघाडीचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही., असं विनायक मेटे म्हणाले.

दरम्यान, ऑफिसला गळती लागली आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलं नाही. हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचंच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विनायक मेटेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर उरलेले आम्ही दोन पक्ष एकत्र राहू- जयंत पाटील

शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आली तर चमत्कार होईल- संजय राऊत

शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे