Home महाराष्ट्र मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप

मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप

मुंबई : महानगरपालिकेने मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा लादण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष आडवा येईल, असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलं.

मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न हा गंभीर आहे. रेडी रेकनरनुसार दर वाढवले तर ते परवडणार नाही. त्यामुळे 30 ते 40 टक्के बोझा सर्वसामान्यांवर पडेल. कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस खचलाय. त्यामुळे 2025 पर्यंत मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा भाई जगताप यांनी दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्ही कोणतीही करवाढ करणार नाही, असं सांगितलं आहे. मात्र, पालिकेने पुढील 5 वर्षे करवाढीचा ठरावही आणू नये, अशी काँग्रेसची मागणी असल्याचं भाई जगताप यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

WTC Final! न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ‘अशी’ असेल उद्याची प्लेइंग-11

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर उरलेले आम्ही दोन पक्ष एकत्र राहू- जयंत पाटील

शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आली तर चमत्कार होईल- संजय राऊत