मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट

0
561

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबमधील लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगवंत मान यांनी भाजप नेत्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा : मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे

भाजपा नेत्यांनी पैशांची आणि मंत्रिपदाची लालच दाखवून भाजपामध्ये पक्षप्रवेशाची ऑफर दिली, असा खळबळजनक दावा भगवंत मान यांनी केला आहे. यावरून मात्र राज्यातील चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी मला पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. तसेच भाजप नेत्याने काही दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला. तसेच भाजपमध्ये येण्यासाठी तुम्ही काय घ्याल? तुम्हाला किती पैसै हवेत? असा सवाल केला. मी एका मोहिमेवर आहे, कमिशनवर नाही. मी भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना ते सोडून पंजाबच्या हक्कासाठी राजकारणात आलो आहे, असं भाजप नेत्याला सांगितलं असल्याचं भगवंत मान म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत इनकमिंग सुरूच; बेलापूरातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश

उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही; सदाभाऊ खोत यांचा घणाघात

“शरद पवारांकडून शिवेंद्रराजेंना धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here