Home क्रीडा हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय

हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय

200

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बेंगलोर : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना बेंगलोरने 7 धावांनी जिंकला.

या सामन्यात राजस्थानने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावत 189 धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मैक्सवेलने तुफानी फलंदाजी करताना 44 चेंडूत 6 चाैकार, 4 षटकारांची आतीषबाजी करत 77 धावांची खेळी केली. तर फाफ ड्यू प्लेसिसनेही शानदार फलंदाजी करताना, 39 चेंडूत 8 चाैकार, 2 षटकारांसह 62 धावांची विस्फोटक खेळी केली. तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, संदीप शर्माने 2, तर रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

ही बातमी पण वाचा : अजितदादांच्या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना, राजस्थानच्या संघानेही शानदार फलंदाजी करताना सामना अखेरच्या षटकापर्यंत लढवला. मात्र 7 धावा त्यांना कमी पडल्या. राजस्थानने 20 षटकात 6 विकेट गमावत 182 धावा केल्या. राजस्थानकडून देवदत्त पडीक्कलने शानदार फलंदाजी करत 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पडीक्कलच्या या खेळीत 7 चाैकार, 1 षटकारांचा समावेश होता. तर यशस्वी जैस्वालने 37 चेंडूत 5 चाैकार, 2 षटकारांसह 47 धावा, ध्रुव जुरेलने 16 चेंडूत 2 चाैकार, 2 षटकारांसह नाबाद 34 धावांची खेळी केली. तर बेंगलोरकडून हर्षल पटेलने 3, तर मोहम्मद सिराज, डेव्हिड विलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय”

मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

इतके राजकीय भूकंप झाले, तर मला…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य