Home महत्वाच्या बातम्या ‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  गेल्या आठवड्यात रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी हानी झाली. या दरड दुर्घटनेत २७ हून अधिक लोकांच्या बळी गेला. या घटनेुळे संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ट्वीट करून आताच्या आणि आधीच्या सरकारला धारेवर धरलं आहे.

ही बातमी पण वाचा :  “100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

मनसेने केलेल्या ट्वीटनुसार इर्शाळवाडीतल्या ग्रामस्थांनी आठवर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. पण आठ वर्षात यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. परिणामी राज्याला इतक्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं.असं ट्विट मनसेनं केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला तर…”

कोट्यवधींची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,