Home महाराष्ट्र “100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

“100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुण्याच्या मावळ परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली आहे. आज रात्री 8.45 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

ही बातमी पण वाचा : “राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला तर…”

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर आज दुपारी अडीच नंतर एक्सप्रेस वेची मुंबई मार्गिका सुरु करण्यात आली होती. आता या घटनेमुळे मुंबई मार्गिका पुन्हा विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच एक्स्प्रेस वेवरील देवदूत यंत्रणा आणि आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मार्गावर आलेले दगड आणि माती बाजुला काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

कोट्यवधींची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,

 “मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच बाहेर पडा; महापालिका आयुक्तांचे निर्देश”