Home महाराष्ट्र “राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला...

“राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला तर…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली, आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे.

अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, म्हणून काही दिवसांपूर्वी मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?, या चर्चांनी जोर धरला असतानात, आता उद्धव ठाकरेंनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,

मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही, त्यामुळे ती चर्चा थांबली असेल. , असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान,असा प्रस्ताव आला तर? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली. मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी मी त्यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आत्ता तरी तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही,’ असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,

 “मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच बाहेर पडा; महापालिका आयुक्तांचे निर्देश”

 “मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, पुरूषांची जात…”