Home अहमदनगर टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,

टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”,

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच बाहेर पडा; महापालिका आयुक्तांचे निर्देश”

अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही. भाजपाने यावर बोलण्यापेक्षा भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्र करू असं निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं, त्याचं काय झालं हे भाजापने सांगांव. टोल हे जे म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात, तो कोण आहे?”, असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, पुरूषांची जात…”

“दुर्देवी! कोल्हापूरच्या केशवराज भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून महिलेचा मृत्यू”

“ठाकरे गटात मोठी उलथापालथ; शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेनंतर आता ‘या’ मोठ्या महिला नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”