Home महाराष्ट्र “ठाकरे गटात मोठी उलथापालथ; शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेनंतर आता ‘या’ मोठ्या महिला...

“ठाकरे गटात मोठी उलथापालथ; शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेनंतर आता ‘या’ मोठ्या महिला नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

Mआमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 40 बंड करत देवेंद्र फडणवीसांसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा कल वाढला.

ठाकरे गटातील अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये आमदार यामिनी जाधव, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, आशा मामेडी यांनी आधीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता अशातच ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : विधान भवनच्या कॉरिडॉरमध्ये जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांची गळाभेट, गप्पाही रंगल्या; चर्चांना उधाण

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि 7 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तृष्णा विश्वासराव यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

कल्याण! बाळ नाल्यात पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं?; बाळाच्या आजोबांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

अजित दादा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी