Home महाराष्ट्र “मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”

“मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. अशातच त्यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे.

ही बातमी पण वाचा : मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान

मुख्यमंत्रीपदावर मी भाजपला नको होतो म्हणून मला दहा ते बारा खाती दिली होती. पक्षातील 40 वर्षाचे फळ म्हणून मला मिळालेली खाते हा माझा अधिकार होता मात्र माझ्यावर राजकारण करुन मला ऐनवेळी डावलण्यात आलं, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

मी भाजपाची बदनामी करतो असे एखादा उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं, असं आवाहन करतानाच मला भाजपमध्ये डावलण्यात आले असले तरी राष्ट्रवादीने मला आमदार केलं म्हणून मी राजकारणात जिवंत आहे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

रामदास आठवलेंनी भाजपकडे केल्या ‘या’ तीन मोठ्या मागण्या, म्हणाले…