Home देश दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी

दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आंदोलनाला बॉलिवूड कलाकारांनी अगदी सुरूवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट देत हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभर वातावरण तापलं आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या घटनेची निंदा केली आहे. यातच दीपिकाने जेएनयूतील आंदोलनाला हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, दीपिकाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने तिचे कौतुक होत आहे. असं असलं तरी ट्विटरवर #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे दिपीकाच्या छपाक या चित्रपटावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-देवेंद्र फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे- अनिल गोटे

-राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?

-स्वतंत्र काश्मीरवरुन निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणतात…

-‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील