Home महाराष्ट्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप सोबत जाण्याची शक्यता होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. राज ठाकरे आणि आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज गुप्त बैठक झाल्याची माहिती मीळाली आहे.

हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचं कळतंय. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजप सोबत जाऊ शकते, असं विधान मनसेचे नेते बाळा नंदगावकर यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या विधानावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

-स्वतंत्र काश्मीरवरुन निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणतात…

-‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील

-सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर

-कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला