Home नाशिक ‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील

‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी टीका शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलत होते.

एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मनसे आता आहे तरी कुठे? यांच्या नेत्याचं आडनाव ठाकरे नसतं, तर आज कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. ठाकरे आडनाव असल्याने त्यांच्याभोवती वलय आहे’, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान,  भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

-सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर

-कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला

-“शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आलेत”

-“सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे अजित पावार कुठेे आहेत”