Home नागपूर “शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र...

“शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही, केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आलेत”

नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आजही मारामारी सुरु आहे. कुणी राजीनामा देत आहे तर कुणी घरी बसतंय तर कुणी ऑफिस फोडतंय. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

गरिब, शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणंदेणं नाही. केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आले आहेत. कसा डल्ला मारता येईल? याचा प्रयत्न यांचा सुरु आहे, असंही ते म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीला दोन पक्ष एकत्रित येतात, एकत्र निवडून येतात, घरोबा करतात, संसार थाटतात. त्यातला एक पक्ष पळून जातो आणि हारलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत नव्याने सरकार थाटतो, त्याठिकाणी घरोबा तयार करतो आणि नव्यानं सरकार स्थापन करतो. हे देशाच्या इतिहासातील पहिलं उदाहरण आहे की, ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांना सोडून दिलं आणि जे हारले आहेत त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्तेच्या लाचारीकरता सरकार तयार झालं, असं  म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.

दरम्यान, शेतकरी अडचणीत आला ऑक्टोबर 2019 मध्ये आणि सांगितलं सप्टेंबर 2019 आधी जे कर्ज थकीत असेल त्यालाच केवळ कर्जमाफी मिळेल. असं या सरकारची विश्वासघाताची मालिका सुरु आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

-“सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे अजित पावार कुठेे आहेत”

-2020 मधल्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी; भारत-श्रीलंका सामना रद्द

-“हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”

-“राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार न देता शेतकऱ्यांना मदत करा”