Home नागपूर “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”

चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी  चंद्रपूरातील रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले असा दावा नाना पटोलेंनी केला, त्यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करत संजय कंचर्लावार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, संजय कंचर्लावार यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी ज्या पद्धतीनं कोणत्याही व्यक्तीचं नाव न घेता भाजप पक्षावर किंवा त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर व नगरसेवकांची जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय हेतू साध्य करण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याच्या वाईट हेतूने भाजपची व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे, असा आरोप संजय कंचर्लावार यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

“…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”

“मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा”

“मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं”