Home महाराष्ट्र “…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”

“…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”

मुंबई : राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असं म्हणत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून अयोध्येतील राम मंदिर निर्मितीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे!, असं सामनामधून  शिवसेनेने म्हटंल आहे

दरम्यान, राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे,असंही  सामनातून शिवसेनेने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा”

“मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं”

पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले

…तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा- रामदास आठवले