Home महाराष्ट्र “राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

“राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने अवघ्या 10 मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालकांकडे खुलासा करण्याची मागणी केली होती. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

शिवसेनेने आता हजरत टिपूचा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे. हे असले भाकड हिंदुत्ववादी, राम मंदिरावर गरळ ओकणारच. शिवसेनेच्या वक्तव्यामागे प्रियंका गांधी यांची प्रेरणा आहे. राम मंदिराला कसून विरोध करणारे आता अस्तनीतल्या निखाऱ्यांच्या मदतीने मंदिर निर्मितीत कोलदांडा घालतायत, अशी टीका भातखळकरांनी केला होती. यावर शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भातखळकर, राम मंदिर ही तुमची किंवा भाजपची खासगी मालमत्ता नाही. आम्ही विटा दिल्या आहेत. शंका असेल तर शिवसेना प्रश्न विचारणार आणि संबंधितांना त्याची उत्तरे द्यावीच लागतील, असं जोरदार प्रत्युत्तर यशवंत जाधव यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”

“मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा”

“मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं”

पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले