जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता…; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा

0
611

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली असून गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. तसेच नागाला कितीही दूध पाजलं, तरी चावायचं तो चावतोच, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’ मनसैनिकांचा आरोप

वाशीममध्ये भांडणं मिटवता मिटवता आपल्या नाकी नऊ आलं होतं, तरी आपण त्यांना सांभाळलं होतं. आपण त्यांना सगळं काही दिलं होतं. जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता सैनिकाचे काटे पाहायचे आहेत. एक गुलाब गेला पण दुसरे गुलाबराव वाघ आपल्यासोबत आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर हल्लाबोल

अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here