Home महाराष्ट्र राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’...

राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’ मनसैनिकांचा आरोप

3707

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता मनसेचे नेते सुद्धा शिंदे गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.

पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह 30-40 जणांनी काल शिंदे गटात प्रवेश केला असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात झळकत होत्या. यावरून आता मनसे पदाधिकारी रवी बाळू पवार आणि रोहित विकास कोरडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा : पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रसारमाध्यमांमध्ये काल आम्ही शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं. मात्र ती आमची निव्वळ फसवणूक होती. आमच्यासोबत 30-40 जण होते. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचंय, सविस्तर चर्चा करून निवेदन द्यायचे,असे सांगितले. मात्र असे काही नसून तिथे आम्हाला सांगितलं की आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे. भगत यांच्याकडून आमची दिशाभूल करण्यात आली आहे, असा आरोप रवी पवार आणि रोहित कोरडे यांनी यावेळी केला. तसेच आम्ही स्पष्ट नकार देत मागे हटलो. आम्ही आजही राजसाहेबांसोबत आहोत आणि उद्याही राहणार आणि सदैव असू. शेवटच्या श्वासापर्यंत मनसेसोबत राहू. राजसाहेब आमचे दैवत आजही आहेत, उद्याही राहतील, अखेरच्या क्षणापर्यंत असतील, असा दावाही रवी पवार आणि रोहित कोरडे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर हल्लाबोल

अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट; नेवासेतील अनेकांनी माजी मंत्री गडाखांच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”