Home पुणे एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर...

एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही; ‘या’ आमदाराचा बंडखोरांवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. अशातच आदित्य ठाकरे हे काल पुणे दाैऱ्यावर होते. आदित्य ठाकरेंच्या पुणे दाैऱ्यात शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी भाषण करताना बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला.

एकेकाळी जे मंत्री होण्यासाठी रडत होते, पाय धरत होते ते आज विचारतायेत आदित्य ठाकरे कोण? मात्र तुम्हाला आत्ता सांगतो आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल सचिन अहिर यांनी यावेळी बंडखोरांवर केला.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, यावेळी बोलताना अहिर यांनी बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही निशाणा साधला. बापू तुमचं वागणं बरं नाही. ज्या ताटात जेवला त्याच ताटात मिठाचा खडा टाकला. जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही अहिर यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार, शिवसेना कधीच सोडणार नाही; ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट; नेवासेतील अनेकांनी माजी मंत्री गडाखांच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”