“सिंधुदुर्गात भाजपचा शिवसेनेला दणका; राणे पती-पत्नीचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश”

0
445

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या भाजपनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. ठिकठिकाणी पक्षाची ताकद वाढण्यासाठी नेतेमंडळींनी कंबर कसली असून फोडाफोडीच्या राजकारणालाही सुरुवात झाली आहे. अशातच आता सिंधुदुर्गमध्ये भाजपनं शिवसेनेला दणका दिला आहे.

हे ही वाचा : …म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी

कुडाळ नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे आणि त्यांचे पती कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आपल्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, प्रज्ञा राणे आणि प्रशांत राणे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत होते. मात्र आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत, तर राहुल गांधींसोबत सुरात सूर मिसळतात”,

नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here