Home महाराष्ट्र नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक

नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील बीएमडबल्यू गाड्यांच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे ही वाचा : पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

तुर्भे एमआयडीसी प्लॉट नंबर D-207 मध्ये एका BMW गाड्यांच्या गोदामात आग लागल्याने 40 ते 45 गाड्या जाळून खाक झाल्या आहेत. यामुळं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

या गोदामाला काल सकाळी 5 वाजता आग लागली होती. तसेच गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी नेरुळ,वाशी,एमआयडीसी अग्निशमनचे 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. यावेळी चारही बाजूने गोदामात ठेवण्यात आलेल्या आलिशान कार पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. परंतु आगीमध्ये कंपनीचं गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाल्या अखेर सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”

भाजप नेत्याची लेक होणार ठाकरे घराण्याची सून; 28 डिसेंबरला मुंबईत विवाह सोहळा

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावंच लागेल”