Home पुणे “राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”

“राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संजय गणपत चितारे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी देत चितारे यांना दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष केले.

राजकीय क्षेत्रात ज्या लोकांकडे पैसे आहेत, त्यांनाच पद मिळते असा समज आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य रिक्षावाल्यास उपनगराध्यक्ष करून हा समज खोडून काढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय चितारे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : भाजप नेत्याची लेक होणार ठाकरे घराण्याची सून; 28 डिसेंबरला मुंबईत विवाह सोहळा

चितारे यांनी नगरसेवक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्णत्वास नेला आहे. तरी पदाची हवा डोक्यात न गेल्याने त्यांनी पाच वर्षांत रिक्षा चालविणे बंद केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चितारे प्रभाग क्रमांक-1 मधून ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. नगरपालिकेतील काही समित्यांवर काम केल्यानंतर पक्षाने त्यांना शेवटच्या वर्षात उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

दरम्यान, या कार्यकाळात त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्यांचे वडील रेल्वे खात्यातून मिस्त्री म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर संजय चितारे हे मागील 22 वर्षांपासून दौंड शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावंच लागेल”

OBC चं राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट; भाजपचा आरोप

“मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड”