Home महाराष्ट्र …म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी

…म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वरळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर याच कुटुंबातील लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेवरून भाजप नेते नितेश राणे यांनी वरळीचे आमदार व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : “संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत, तर राहुल गांधींसोबत सुरात सूर मिसळतात”

नितेश राणेंनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

नवी मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीच्या गोदामाला भीषण आग; 45 गाड्या जळून खाक

पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

“राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”