Home पुणे मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यावर वसंत मोरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे. पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत. त्यांना याबद्दल विचारा…, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आली समोर; ‘या’ नेत्यांना मिळणार उमेदवारी

मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू… पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडणून देत नाहीत, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढणार? वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ

एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा