Home महाराष्ट्र एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुक तोंडावर आली असून राज्यात आता आरोपप्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. अशातच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एक मोठा दावा केला आहे.

मरेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं एकनाथ खडसेंनी जाहीर करावं. हिम्मत असेल तर एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी., असं आव्हान संजय पवार यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना केलं.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; लंकेंनंतर आता ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

खडसे यांनी स्वत:ला रावेरची उमेदवारी मागून घेतली. त्यांच्यासाठी शरद पवार गटाने जागाही सोडली. आता सुनेला उमेदवारी जाहीर होताच खडसे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. एकाच घरात भाजपकडून सुनेसाठी खासदारकी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून आमदारकी नाथाभाऊंनी घेतली आहे. नाथाभाऊंनी एकाच हाताने दोन प्रसाद घेऊ नये. त्यांना ते शोभत नाही. काही दिवसांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील. त्यांची मुलगी रोहिणी खडसे या भाजपमधूनच विधानसभेची निवडणूक लढवतील, असं संजय पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे जळगावातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हेही वर्तवण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ नेत्यावर 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…