Home महाराष्ट्र “मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप”

“मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणली. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राऊतांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वाद आणखी वाढला आहे.

हे ही वाचा : …हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. योगी आदित्यनाथ यांनीही याआधी एकदा एका मुलाखतीच्या शेवटी या शब्दाचा वापर केला होता. दरम्यान ही शिवी नसून आसाममधील लाखो आदिवासींचं आडनाव आहे, अशी माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “दुनिया में चुतियोंकी कमी नही, एक ढूंढोतो हजार मिलेंगे…जरा योगिजी को सुनिये.., यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्यानं भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दिप्ती रावत यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

‘मला भावलेले पवार साहेब’ असं कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ

‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट