Home महाराष्ट्र ‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सत्ताधारी शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवलाय.

महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते आहे. मुंबईला भ्रष्टाचारातून बाहेर काढायचं आहे. मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवायची आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट

शिवसेना फक्त भावनिक डायलॉगबाजी करते. त्यांच्या डायलॉगबाजीला भुलू नका. निवडून आल्यानंतर ते तुम्हाला विसरतात. मुंबई महापालिकेत आपल्याला परिवर्तन करायचं आहे. राज्यात सरकार यायचं तेव्हा येईल पण आपण संघर्ष करत राहू. मात्र, 2024 ला भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही फडणवीसांनी यावेळी केलाय.

दरम्यान, आपलं सरकार गेल्यानंतर मेट्रोची कामं एकतर स्थगित झाली किंवा मंदगतीने सुरु आहेत. आधी आरोग्य विभागाचा पेपर फुटला आता म्हाडाचाही फुटला. एक पेपरही या राज्य सरकारला धड घेता येत नाही. आदल्या दिवशी रात्री सांगतात की परीक्षा रद्द झाली. तरुणांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा

कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी…; शरद पवारांनी दिला अठवणींना उजाळा

“गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला गरिबांची सेवा करण्याचा वारसा दिलाय, अन् तो आपण गावागावापर्यंत पोहोचवायला