‘मला भावलेले पवार साहेब’ असं कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ

0
492

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा : ‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘मला भावलेले पवार साहेब’ असे कॅप्शन देत अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दूरदर्शी दृष्टिकोन, लोकांची सेवा करण्याची वचनबद्धता आणि प्रचंड इच्छाशक्ती, संयमी स्वभाव खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आई जगदंबा त्यांना चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा

कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी…; शरद पवारांनी दिला अठवणींना उजाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here