Home महाराष्ट्र “भाजपला मोठा धक्का, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद”

“भाजपला मोठा धक्का, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद”

733

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

लातूर जिल्हा बँकेत 19 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. त्यामुळे पुन्हा बँकेची एक हाती सत्ता काँग्रेसकडेच असणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे ही वाचा : “ठाण्यात शिवसेनेची ताकद वाढली; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

भाजपच्या अनेक उमेदवारांना बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे काढताना अडचणी आल्या. अनेकांनी छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले सहकार बोर्डाची थकबाकी असल्यासही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?; शिवसेनेचा सवाल

“सरकारने 97% कुटूंबाचं उत्पन्न कमी केलं, पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात”

सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी