Home देश “त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

“त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. मात्र त्रिपुरामध्ये भाजपला काल दोन मोठे धक्के बसले आहेत.

भाजपच्या 2 मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर लगेज दुसऱ्या दिवशी या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : “खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

त्रिपुराचे माजी आरोग्य मंत्री सुदिप रॉय बर्मन आणि आशिष कुमार साहा यांनी काल आमदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांनी आज सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद करणार- सुजय विखे पाटील

कुठलंही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही- विश्वजीत कदम

किरीट सोमय्या प्रकरणावरून खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या…