Home महाराष्ट्र ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद...

ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद करणार- सुजय विखे पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिर्डी : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल ते दुकान मी स्वत: बंद करणार, असा इशारा सुजय विखे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. ते राहता येथे लायन्स क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा : कुठलंही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही- विश्वजीत कदम

ज्या विषयात समाजहित नाही त्याला मी विरोध करत राहणार. अनेक शाळा आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे प्रश्न मी सोडवले आहेत. जे मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या घरातील महिलांसोबत वाईट वेळ येऊ देणार नाही. परमेश्वर करतो तशी वाईट वेळ येऊ नये. मात्र, ती वेळ शिर्डी मतदारसंघात येण्याची वाट आपण पाहणार नाही, असंही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या प्रकरणावरून खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या…

“शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे दणका देणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी”

‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं आसावं; …या गोष्टीमुळे मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले