Home देश “खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

“खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज अचानक त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत माझे जुने दोस्त आहे. आज चहा पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांच्या घरी आलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं. तसेच या दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली.

हे ही वाचा : ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद करणार- सुजय विखे पाटील

दरम्यान, राऊत माझे जुने दोस्त आहेत. दरवर्षी ते मला आणि शरद पवारांना जेवायला सुद्धा बोलावतात. आज त्यांच्यासोबत चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या घरी आलो. बाकी काही विषय नाही. एक खासदार दुसऱ्या खासदाराला भेटू शकतो हेच दिल्लीचं वैशिष्ट्यं आहे, असंही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

कुठलंही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही- विश्वजीत कदम

किरीट सोमय्या प्रकरणावरून खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या…

“शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे दणका देणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी”